राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल; निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकाला फटका | Maharashtra Farmers
कधी ऊन तर, कधी पाऊस ,तर कधी ढगाळ वातावरण अशा निसर्गाच्या लहरीपणामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाला फटका बसला आहे. गेल्या १० दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्या नुकसानीतून पिकांना मोठा फटका बसला होता त्यातून उरलेले पीक वाचवत असतानाच पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली अन् होत्याचं नव्हतं केलं. राज्यातील अनेक भागातील शेतकरी या अस्मानी संकटामुळे हवालदिल झाले आहेत #nature #Mahashtra #farmer